साने गुरुजी वाङ्मय

आत्मकथनपर कादंबरी 

 कादंबरी

कथा-साहित्य

'विश्राम', 'सोनसाखळी', 'मुलांसाठी फुले', 'अमोल गोष्टी', 'दारूबंदीच्या कथा', 'साक्षरतेच्या कथा', 'सुंदर कथा', 'श्रमणारी लक्ष्मी', 'त्रिवेणी' (शबरी), 'कावळे', 'जनी', 'मोरी गाय', 'जयंता', 'शुक्री', 'कलिंगडाच्या साली' इत्यादी कथा साहित्याची निर्मिती गुरुजींनी केली. तसेच गुरुजींचे खालील काही कथा साहित्य खूप गाजले: 

काव्य

नाट्य वाङ्मय 

याचबरोबर ‘रामाचा शेला’, ‘ही खरी संस्कृती’, ‘सावित्री’ इत्यादी नाटके गुरुजींनी लिहिली. 

 वैचारिक वाङ्मय 

त्याचपमाणे ‘कर्तव्याची हाक’, ‘स्वातंत्र्याचा अर्थ’, ‘समाजवाद हा एकच मार्ग’, ‘भारतीय नारी’, ‘मदिर प्रवेश’ ही गुरूजींची निबंधाकात्मक शैलीतील वैचारिक साहित्यसंपदा प्रसिद्ध झाली आहे.

पत्र - वाङ्मय 

चरित्र वाङ्मय 

‘नामदार गोखले’ चरित्र (१९२५), ‘ईंशवरचंद्र विद्यासागर’ (१९२७), ‘इतिहासाचार्य राजवाडे’ (१९२८), ‘शिशिकुमार घोष’ (१९२९), ‘बेंजामिन फ्रँकलिन’ (१९२९), ‘कविवर्य रवींद्रनाथ  टागोर’ (१९३०), ‘जीवनप्रकाशन’ (१९३७), ‘श्री.  शिवराय’ (१९४४), ‘विनोबा भावे’ (१९४४), ‘देशबंधू दास’ (१९४४), ‘महात्मा गांधी दर्शन’ (१९४८). ‘महात्मा गौतम बुद्ध’, ‘बापूजींच्या   गोड गोष्टी’, ‘आपले नेहरू’, ‘लोकमान्य टिळक’, ‘भगवान  श्रीकृष्ण’, ‘इस्लामी संस्कृती’ (मुहंमद पैगंबर चरित्र), ‘महात्मा गांधी दर्शन’ इत्यादी चरित्रे गुरुजींनी लिहिली. यामध्ये गुरूजींनी या व्यक्तींचा पूर्ण परिचय, कार्य, कर्तृत्व, ‘विचार आणि आचार’, त्यांनी केलेला त्याग, कष्ट आणि त्यांची जीवनदृष्टी यांविषयी गुरुजींनी लिहिले आहे. 

संपादित

स्त्रीजीवन, भाग १ व २ (१९४०) : यामधून गुरुजींनी कहाण्या, उखाणे, ओव्या, गाणी इत्यादींचे संकलन यामध्ये केले आहे. 

अनुवादित साहित्य

‘खेड्यात जावून काय कराल?’, ‘राष्ट्धर्म’, ‘स्वदेशी समाज’, ‘मला म्हणजे काय?’, ‘समाजधर्म’, ‘कला आणि इतर निबंध’, ‘कल्की अथवा संस्कृतीचे भवितव्य’, ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’, ‘कुरल’, ‘ऑमेलची चिंतनिका’, ‘मानवजातीची कथा’, ‘दिल्ली डायरी’, ‘साधना’, ‘ना खंत ना खेद’ इत्यादी अनुवादित साहित्याची निर्मिती गुरुजींनी केली.

 संपादित साहित्य

तसेच, ‘कमलफुले’ (गोष्टी), ‘मेंग चियांग आणि इतर कथा’, ‘गुरूजींच्या गोष्टी’, ‘स्वप्न आणि सत्य’ (वैचारिक लेख), ‘हिमालयाची शिखरे’ (चरित्रात्मक निबंध), ‘चंद्रभागेच्या वाळवंटी’ (संत चरित्रे), ‘गुरुजींचे उपदेश’ इत्यादी आणि  याशिवाय त्यांचे अनेक अप्रकाशीत साहित्यही आहे.